कर्णधार गिलचा कमाल फॉर्म! एकाच मालिकेत रचले 5 मोठे विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने पहिल्या डावात 269 धावांची खेळी खेळून अनेक विक्रम केले. आता दुसऱ्या डावातही कर्णधार गिलने फलंदाजीने आपली जादू दाखवली आहे. दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करून गिलने कर्णधार म्हणून इतिहास रचला आहे. याशिवाय त्याने विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांचे मोठे विक्रम मोडले आहेत. दुसऱ्या डावातही गिलने 5 मोठे विक्रम केले आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 80 धावा केल्या आहेत. शतकापूर्वी शुभमन गिलने 5 मोठे विक्रम केले आहेत. गिल इंग्लंडच्या भूमीवर 1 कसोटी सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला. इतकेच नाही तर तो कसोटी सामन्यात 300 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय कर्णधारही ठरला. कर्णधार म्हणून पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही गिलच्या नावावर नोंदला गेला आहे. गिलने आतापर्यंत 482 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता ज्याने 449 धावा केल्या होत्या.

कर्णधार शुभमन गिल हा कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. विराट कोहलीने पदार्पणाच्या मालिकेत 449 धावा केल्या. तर गिलने त्याच्या चौथ्या डावात 482 धावांचा टप्पा ओलांडला आहे. गिल कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाजही बनला आहे. यापूर्वी हा विक्रम अनुभवी सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 344 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात 350 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Comments are closed.