ईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने रचला इतिहास! 13 वर्षांनंतर संघ दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये

ईस्ट झोन संघाने दुलीप ट्रॉफी (Dulip Trophy) 2026 च्या फायनलमध्ये 13 वर्षांनंतर प्रवेश केला आहे. ईशान किशनच्या (Ishaan kishan under captaincy) नेतृत्वाखाली ईस्ट झोनने पहिल्या उपांत्य सामन्यात (semi- Final) सेंट्रल झोनचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात 7 विकेट्स घेणाऱ्या मुकेश कुमारला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. आता फायनल सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर 6 सप्टेंबरपासून सुरू होईल, ज्यामध्ये ईस्ट झोनची गाठ दुसऱ्या सेमीफायनलच्या (नॉर्थ झोन विरुद्ध साऊथ झोन) विजेत्या संघाशी पडेल.

टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सेंट्रल झोनने पहिल्या डावात 266 धावा केल्या. या डावात रिंकू सिंगने सर्वाधिक 60 धावा केल्या, तर आर्यन जुयालने 46 धावा केल्या. याशिवाय, यश ठाकुरने नाबाद 30 धावांची खेळी केली.

ईस्ट झोनकडून मुकेश कुमार (56/3) आणि अभिजीत सरकार यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी (Mohmmed Shami) आणि कौनेन कुरैशी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तर देताना ईस्ट झोनचा पहिला डावही 266 धावांत आटोपला. ओपनिंग जोडी म्हणून वैभव सूर्यवंशीने अभिमन्यू ईश्वरनसह पहिल्या विकेटसाठी 153 चेंडूंमध्ये 162 धावांची भागीदारी केली. वैभव 81 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला, तर अभिमन्यूने 8 चौकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. विरोधी संघाकडून हर्ष दुबेने 4 विकेट्स पटकावल्या, तर आर्यन पांडे आणि यश ठाकुर यांना प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळाल्या.

सेंट्रल झोनचा दुसरा डाव 158 धावांवर संपला. या संघाने 97 धावांपर्यंत 8 विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर अरशद खानने हर्ष दुबेसोबत 9व्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करत संघाला लाजीरवाण्या स्थितीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हर्ष 3 चौकारांसह 24 धावा करून बाद झाला. या डावात मुकेश कुमारने 44 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. अभिजीत सरकार, अनुकूल रॉय आणि कौनेन कुरैशी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ईस्ट झोनने 39.3 षटकांत सामना जिंकला. सूर्यवंशीने ईश्वरनसोबत पहिल्या विकेटसाठी 85 चेंडूंमध्ये 61 धावा करून संघाला मजबूत सुरुवात करून दिली. वैभव 43 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 40 धावा करून आऊट झाला. संघाने 65 धावांपर्यंत 2 विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर कुमार कुशाग्रने मोर्चा सांभाळला. त्याने विराट सिंगसोबत (12) 28 धावा आणि कॅप्टन ईशान किशनसोबत 31 धावांची भागीदारी करत संघाला 124 धावांपर्यंत पोहोचवले.

32 व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे कुशाग्र (22) आणि अनुकूल रॉय (0) बाद झाले. मात्र, कर्णधार ईशान मैदानात टिकून राहिला, त्याने 41 चेंडूंमध्ये 5 बाउंड्रीच्या (चौकारांच्या) मदतीने नाबाद 39 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हर्ष दुबेने 53 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या, तर सारांश जैन आणि यश ठाकुर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Comments are closed.