Champions Trophy: ऑस्ट्रेलियाची ताकद रोहितला माहिती, सेमीफायनलपूर्वी सांगितला प्लॅन!

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या (ICC Champions Trophy) शेवटच्या गट सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला. आता भारतीय संघ उद्या (4 मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया नॉक-आउट सामन्यांमध्ये कशी कामगिरी करते हे देखील चांगले माहिती आहे. याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडवरील शानदार विजयानंतर पुरस्कार वितरण समारंभात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमध्ये चांगला खेळण्याचा इतिहास आहे. सेमीफायनलमध्ये आपल्याला गोष्टी आपल्या नियंत्रणात आणाव्या लागतील. त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”

पुढे बोलताना रोहित म्हणाला, “कमी सामन्यांसह अशा स्पर्धेत लय राखणे महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. चुका होतात पण त्या दुरुस्त करणे महत्वाचे आहे. आमच्यासाठी शिखरावर पोहोचणे खूप महत्वाचे होते. न्यूझीलंड हा एक चांगला संघ आहे आणि अलिकडच्या काळात त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.”

रोहितने भारताच्या विजयाचे श्रेय वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) 5 विकेट्स आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 98 धावांच्या भागीदारीला दिले.

तो म्हणाला, “पहिल्या पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्यानंतर अक्षर आणि श्रेयस यांच्यातील भागीदारी महत्त्वाची होती. त्याने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. आम्हाला ही धावसंख्या वाचवण्याचा आत्मविश्वास होता.”

रोहित म्हणाला, “वरुणकडे काहीतरी वेगळे आहे, आम्हाला पहायचे होते की तो या परिस्थितीत काय करू शकतो. पुढच्या सामन्यात आपल्याला संघ निवडीचा विचार करावा लागेल. पण ते चांगले डोकेदुखी ठरेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघ चॅम्पियन्स होऊ शकतो पण, माजी खेळाडूंनी काय सांगितला फॉर्म्युला ?
“रोहित शर्मा भारताचा सर्वात वाईट कर्णधार आहे…” काँग्रेस पक्षाच्या शमा मोहम्मदचे वादग्रस्त वक्तव्य!
Champions Trophy: विराट कोहली अक्षर पटेलच्या पाया का पडला? कारण काय?

Comments are closed.