IND vs PAK: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या ‘या’ निर्णयाने बदललं सामन्याचं चित्रं, टीम इंडियाच्या विजयासाठी ठरला निर्णायक!
टीम इंडियाने (Team india) परत पाकिस्तानला पराभूत केले. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेच्या सुपर 4 राउंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेटने विजय मिळवला. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली आणि फक्त 39 चेंडूत 74 धावांची धमाकेदार फटकेबाजी केली. तसेच, शुबमन गिलनेही (Shubman gill) फक्त 28 चेंडूत 47 धावा केल्या.
तरीही, एका टप्प्यावर पाकिस्तानची टीम पूर्णपणे हावी दिसत होती. साहिबजादा फरहान आणि सॅम अयूब यांची जोडी जोरदार खेळ करत होती आणि पाकिस्तान उच्च स्कोरच्या दिशेने जात होता. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) एका निर्णयाने संपूर्ण सामना उलथून टाकला. बॉलिंग अटॅकमध्ये केलेला बदल भारतीय टीमसाठी वरदान ठरला.
फखर जमान जेव्हा पवेलियन परत गेला, तेव्हा पाकिस्तानचा स्कोर फक्त 21 होता. फखर फक्त 9 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर फरहान आणि सॅम अयूब यांची जोडी सामना सांभाळू लागली आणि जोरदार धावा केल्या. खास करून फरहान थांबत नव्हता आणि त्याने भारतीय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सुद्धा लक्ष्य केले. अयूब-फरहान यांनी दुसऱ्या विकेटसाठी पटकन 72 धावा जोडल्या. 10.3 षटकांमध्ये पाकिस्तानचा स्कोर 93 धावांवर पोहोचले होता.
दबावाच्या परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने बॉलिंग अटॅकमध्ये बदल केला आणि चेंडू शिवम दुबेला (Shivam Dube) दिला. शिवम दुबने लगेचच सॅम अयूबला 23 धावांवर पवेलियन पाठवले. त्यानंतर त्याने फरहानची अर्धशतकी फटकेबाजीही थांबवत त्यालाही बाद केले.
दुबेने घेतलेल्या या दोन विकेट्समुळे सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली. 200 धावांपर्यंत पोहोचत असलेली पाकिस्तानची टीम 20 षटकांमध्ये 5 विकेट गमावून फक्त 171 धावांवर थांबली. दुबेने फक्त 4 षटकांमध्ये 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.