पाकिस्तानमध्ये पोलीस स्टेशनवर भीषण आत्मघाती हल्ला, स्फोटकांनी भरलेली कार धडकवून पोलीस चौकी उडवली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनला लक्ष्य करत भीषण आत्मघाती हल्ला केला आहे. स्फोटकांनी भरलेली एक कार पोलीस स्टेशनला धडकवून मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या भीषण हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त न्यूज 24 ने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, पोलीस स्टेशनची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक गर्दीच्या वेळी हा हल्ला घडवून आणला, ज्यामध्ये सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला, असे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप काही लोक दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.