Costal Road Car Fire – कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, आगीमुळे प्रचंड वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या कॉस्टल रोडवर अपघाताची बातमी समोर आली आहे. कोस्टल रोडवरील बोगद्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे संपूर्ण बोगद्यात धुराचे लोण पसरले आणि काही क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास 3 किमी पर्यंत वाहनांच्या लाबंच लाब रांगा लागल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Comments are closed.