सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी

मुंबईतल्या मालाड येथील एका रहिवासी संकुलातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सात व र्षांच्या मुलाला सोसायटीच्या आवारात खेळताना कारने धडक दिल्याने त्याच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता इंटरफेस हाइट्स येथे घडली. या घटनेनंतर बांगूर नगर पोलिसांनी चालक श्वेता शेट्टी-राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्वय मजूमदार हा सोसायटीच्या आवारात खेळत होता. तेव्हा शेजाऱ्याची कार त्याच्या पायावरून गेली. तो इतर मुलांसोबत खेळत होता. अन्वयची आई, महुआ मजूमदार यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

जखमी मुलाला तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या डाव्या घोट्याला आणि दुसऱ्या हाडाला झालेल्या गंभीर फ्रॅक्चरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित वाहन काळ्या रंगाची टोयोटा हायरायडर असून त्याचा नंबर MH47B.T.3070 असा आहे

Comments are closed.