पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 400 किमी धावणार कार; 1 हजार किलोवॅटचा चार्जर बनवल्याचा चिनी कंपनीचा दावा

चीनची इलेक्ट्रिक वाहन कंपनी बीवायडीने एक चार्जिंग सिस्टम डेव्हलप केले असून याद्वारे इलेक्ट्रिक कार चार्ज करता येईल. अवघ्या पाच मिनिटांत कार पूर्ण चार्ज होईल. पेट्रोल भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेत ही कार 400 किलोमीटर धावेल इतकी चार्ज होईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने याला ‘सुपर ई-प्लॅटफॉर्म’ असे नाव दिले आहे. बीवायडीने शेन्झेन मुख्यालयातून लाइव्ह स्ट्रीमद्वारे ‘सुपर ई-प्लॅटफॉर्म’ सादर केले. या वेळी कंपनीचे संस्थापक वांग चुआनफू उपस्थित होते.
सुपरई-प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त 1000 किलोवॅट (केडब्ल्यू) चार्जिंगचा वेग प्रदान करेल, असे वांग चुआनफू म्हणाले. नवीन चार्जिंग सिस्टम सध्या दोन नवीन ईव्ही कार हान एल सेडान आणि टँग एल एसयूव्हीला चार्जिंग करतील. या कारची सुरुवातीची किंमत 32.33 लाख रुपये इतकी आहे. टेस्ला 2014 पासून चीनमध्ये त्यांचे सुपरचार्जर विकत आहे.
टेस्लाच्या चार्जरपेक्षा दुप्पट वेग
बीवायडीच्या ‘सुपर ई-प्लॅटफॉर्म’चा 1,000 किलोवॅट चार्जिंग स्पीड हा एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या चार्जरपेक्षा दुप्पट वेगाने कार चार्ज करू शकतो, असा दावा बीवायडी कंपनीने केला आहे.
Comments are closed.