अल्कराझचा झंझावात कायम, आता उपांत्य फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी गाठ

विम्बल्डनच्या हिरवळीवरील जेतेपदाची हॅटट्रिक स्पॅनिश कार्लोस अल्कराझपासून दोन पावले दूर आहे. त्याने आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या पॅमरुन नोरीचा 6-2, 6-3, 6-3 असा अवघ्या 99 मिनीटांत फडशा पाडला. आता त्याची गाठ अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी पडेल. फ्रिट्झने शानदार खेळ दाखवत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत रशियाच्या 17व्या मानांकित करेन खाचानोव्हचा 6-3, 6-4, 1-6, 7-6(4) असा पराभव केला. त्याने प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.
आज पुरुष एकेरीच्या पहिल्या दोन्ही लढती एकतर्फी झाल्या. अल्कराझच्या झंझावातापुढे पॅमरून नोरीचे काहीएक चालले नाही. एकाही सेटमध्ये नोरी अल्कराझला झुंज देऊ शकला नाही. त्यामुळे सामना 1 तास 39 मिनीटांत आटोपला. दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात सुरुवातीची दोन सेट्स सहज जिंकल्यानंतर तिसर्या सेटमध्ये फ्रिट्झला हार पत्करावी लागली. मात्र चौथ्या सेटमध्ये दोघांमध्ये चुरस झाली आणि टायब्रेकमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना फ्रिट्झने शेवटी निर्णायक खेळी करत सामना जिंकला. जगातील पाचव्या क्रमांकाच्या या खेळाडूने यंदा पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Comments are closed.