कार्ल्सबर्ग की किंगफिशर? लोक कोणती बिअर जास्त पितात? वर्षभरात 323 कोटी बाटल्यांची विक्री

बिअर विक्रीच्या बातम्या: भारतात किंगफिशर, बिरा, बुडवेझर, टुबॉर्ग इत्यादी अनेक ब्रँडची बिअर मोठ्या प्रमाणात विकली जाते. किंगफिशरचा (Kingfisher ) बाजारातील हिस्सा सुमारे 42.4 टक्के आहे. पण कार्ल्सबर्ग (Carlsberg) ही सर्वाधिक विक्री झालेली बिअर (बिअर विक्री) आहे. कार्ल्सबर्गचा बाजारातील हिस्सा किंगफिशरच्या तुलनेत कमी आहे, परंतु प्रीमियम विभागात तो वेगाने वाढत आहे. लोकांनी एका वर्षात कार्ल्सबर्ग बियर मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे, ज्यामुळं कंपनीचा नफा एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

कंपनीच्या नफ्यात वर्षभरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ

किंगफिशरचा बाजारातील हिस्सा सुमारे 42.4 टक्के आहे. पण कार्ल्सबर्ग यापैकी सर्वाधिक खपलेली बिअर म्हणून पुढे आली आहे. लोकांनी एका वर्षात मोठ्या प्रमाणात  किंगफिशरची खरेदी केली आहे. ज्यामुळे कंपनीचा नफा एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

कार्ल्सबर्ग इंडियाचे एकूण उत्पन्न 15.2 टक्क्यांनी वाढले

बिअर उत्पादक कंपनी कार्ल्सबर्ग इंडियाचा आर्थिक वर्ष 2023-24 साठी नफा 60.5 टक्क्यांनी वाढून 323.1 कोटी रुपये झाला आहे. कार्ल्सबर्ग यांनी कंपनीच्या रजिस्ट्रारला (आरओसी) याबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कार्ल्सबर्ग इंडियाचे एकूण उत्पन्न 15.2 टक्क्यांनी वाढून 8,044.9 कोटी रुपये झाले आहे. कार्ल्सबर्गची भारतातील आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे. अशा प्रकारे कंपनीने 8,000 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला.

बिअर मार्केटमध्ये झपाट्यानं वाढ

कंपनीने दिलेल्या माहितीनुसा, 2023-24 या आर्थिक वर्षात सिंगल फायनान्शियल स्टेटमेंट अंतर्गत तिचा नफा 323 कोटी रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, बिअर उद्योगाने व्हॉल्यूमच्या बाबतीत चांगली प्रगती केली आहे. आर्थिक वर्षात कंपनीची रोकड आणि बँक शिल्लक अनुक्रमे 930.4 कोटी रुपये आणि 1,116.5 कोटी रुपये झाली आहे.

गेल्या वर्षी नफा किती?

कार्ल्सबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 201.3 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. स्टँडअलोन आधारावर, कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 6,937 कोटी रुपये होते. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा उत्पादन शुल्क खर्च 13.4 टक्क्यांनी वाढून 4,877.8 कोटी रुपये झाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ते 4,301.6 कोटी रुपये होते. कार्ल्सबर्ग इंडियाचा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जाहिरात मोहिमेचा खर्च 96.5 कोटी रुपये होता आणि एकूण खर्च 13.4 टक्क्यांनी वाढून 7,628.3 कोटी रुपये झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

HSC Exam : बुलढाण्यात दारू अन् बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांची परीक्षा; तर जालन्याच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट

अधिक पाहा..

Comments are closed.