Jamkhed News – जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

बँकेतुन काढलेले तीन लाख रुपये स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यावेळी त्यातील तीन लाख रुपये काढून चोरटा लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार दि 10 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अभय अशोक शिंगवी, (47), हे शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक जामखेड येथे गेले व त्यांनी चेक द्वारे साडेतीन लाख रुपये काढले. त्या मधिल पन्नास हजार रुपये खिशात ठेवले व उर्वरित तीन लाख रुपये स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. यानंतर फिर्यादी शिंगवी हे आपल्या जयहिंद चौक येथील चष्म्याच्या दुकानासमोर आले. यावेळी दुकानात गिर्हाईक असल्याने ते गाडी दुकानासमोर लाऊन दुकानात गेले. गिर्हाईक झाल्यावर लगेचच ते काढलेले पैसे बीड रोड येथील नगर मर्चंट बँकेत भरण्यासाठी गेले. यावेळी डिक्कीत ठेवलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गाडीची डिक्की उघडली मात्र डिक्कीत पैसै आढळुन आले नाहीत. त्यामुळे डिक्कीतील पैसे चोरीला गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर शिंगवी यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. फिर्यादी अभय शिंगवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ. प्रवीण इंगळे हे करीत आहेत.
Comments are closed.