मतदार यादीचे काम करण्यास नकार, बीएलओच्या विरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीएलओ म्हणून नियुक्ती केल्यानंतर मतदार यादीचे काम करण्यास नकार दिल्याप्रकरणी जीवन सोनावणे यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनावणे हे नवी मुंबई पालिकेच्या परिमंडळ दोनमध्ये टंकलेखक लिपिक या पदावर काम करत आहेत. प्रीती पाटील या ऐरोली विधानसभा क्षेत्राच्या मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांनी महापालिकेचे लिपिक जीवन सोनावणे यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र सोनावणे यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यांच्याकडे यादी भाग क्रमांकचे सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

Comments are closed.