‘वोट चोरी पकडणं’ हा फक्त निवडणुकीचा विषय नाही, तर… आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

“वोट चोरी पकडणं हा फक्त निवडणुकीचा विषय नाही, तर, निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे,” असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत त्यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला येऊ.
X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेले दहा-बारा दिवस आम्ही मुंबईतील अनेक शाखांमध्ये भेटी देऊन मुंबईच्या प्रारूप मतदार यादीवर काम करत आहोत. शिवसैनिक आणि सर्व अंगीकृत संघटना घरोघरी जाऊन दुबार मतदार, वगळलेले मतदार आणि याद्यांतील घोळ शोधून, या संपूर्ण विषयावर सखोल काम करत आहेत. वोट चोरी पकडणं हा फक्त निवडणुकीचा विषय नाही; तर निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे.”
नागरिकांना आवाहन करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी आपणा सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करतो, की नागरिक म्हणून आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे नक्की तपासून पाहा.”
गेले दहा-बारा दिवस आम्ही मुंबईतील अनेक शाखांमध्ये भेटी देऊन मुंबईच्या प्रारूप मतदार यादीवर काम करत आहोत.
शिवसैनिक आणि सर्व अंगीकृत संघटना घरोघरी जाऊन दुबार मतदार, वगळलेले मतदार आणि याद्यांतील घोळ शोधून, ह्या संपूर्ण विषयावर सखोल काम करत आहेत.
'मत चोरी पकाड्यान' फक्त.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) १ डिसेंबर २०२५

Comments are closed.