प्रेयसीसोबत रुममध्ये घुसताच रंगेहाथ पकडले; बेळगावात बायकोने नवऱ्याला लॉजच्या बाहेर धू धू धुतले
बेळगाव वार्ता: प्रेयसीसोबत लॉजमध्ये सापडलेल्या पतीला पत्नीने लॉज बाहेर काढून भर रस्त्यावर चप्पलने बेदम चोप दिल्याची घटना बेळगावमधील चिकोडी शहरातील बस स्थानकापासून जवळ असलेल्या एका लॉजच्या आवारात घडली. सदर घटनेच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अविनाश भोसले हा आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये आला होता. पतीबाबत संशय आल्याने पत्नीने त्याच्यावर पाळत ठेवली होती. पती प्रेयसीला घेऊन रुममध्ये गेला असता पत्नीने रंगेहाथ पकडले. संतापलेल्या पत्नीने पतीची कॉलर धरून चपलाने मारत लॉजमधून रस्त्यावर आणले. रस्त्यावर आणून पतीला चोप दिला. यावेळी पत्नीच्या वडिलांनी देखील जावयाची चांगली धुलाई केली. पती-पत्नीचे भांडण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आणखी वाचा
Comments are closed.