बिल्डर्स आणि बँकांच्या 'मिलीभिमुख'वर सीबीआयचा तडाखा

बिल्डर्स आणि बँकांच्या ‘साटलोट्या’वर सीबीआयचा प्रहार

नवी दिल्ली -सीबीआयने ८ राज्यांच्या ७७ठिकाणांवर मंगळवारी छापे टाकले आहेत. ही मोठी कारवाई काही बिल्डर्स आणि वित्तीय संस्थांमधील संगनमत प्रकरणी आहे. अनेक बिल्डर्स आणि वित्तीय संस्थांनी मिळून घर खरेदीदारांच्या भांडवलातून फेरफार केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने २२ गुन्हे नोंदविले.

सीबीआयने दिल्ली, बेंगळूर, चेन्नई, पुरुचेरी येथे देखील ही कारवाई केली आहे. हे प्रकरण सुपरटेक लिमिटेड समवेत अनेक बिल्डर्सशी निगडित आहे. याची चौकशी न्यायालयाने सीबीआयला सोपविली होती.
एनसीआरच्या आरोपी बिल्डर्स विरोधात गुन्हा नोंद करत चौकशी सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०२५ रोजी सीबीआयला दिला होता.

घरखरेदीदारांची फसवणूक झालेल्या २२ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करण्याचा आदेश सीबीआयला देण्यात आला होता. यानंतर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने सीबीआयला आणखी ६ गुन्हे नोंदविण्याचा निर्देश दिला होता. बिल्डर्स आणि बँकांमधील साटलोट्याप्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. बँका आणि बिल्डर्सनी मिळून फसवणूक केल्याची तक्रार होती.

Comments are closed.