सीबीएसई दहावीचा गणिताचा पेपर कठीण, फेरपरीक्षेची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेची सुरुवात आज गणित विषयाच्या पेपरने झाली. स्टँडर्ड आणि बेसिक या दोन्ही फॉरमॅटमध्ये हा पेपर घेण्यात आला. यातील बेसिक फॉरमॅटमधील पेपर तुलनेने खूपच कठीण असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या विषयाची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सीबीएसई दहावी इयत्तेत गणित हा विषय दोन स्वरूपात शिकवला जातो. बेसिक आणि स्टँडर्ड गणित असे त्याचे स्वरूप असते. बेसिक स्तरावरील गणित हे तुलनेने सोपे असते. गणितात फारसा रस नसलेले विद्यार्थी हा विषय घेतात तर स्टँडर्ड स्तरावरील गणित तुलनेने कठीण आणि पुढे त्याच विषयात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱयांसाठी असते. हे गणित विश्लेषणात्मक असते. आजच्या परीक्षेत आलेल्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची पातळी विषयाच्या स्वरूपाच्या नेमकी उलट होती. स्टँडर्ड मॅथ्सचा पेपर तुलनेने सोपा, समतोल आणि सोडवता येईल असा होता तर बेसिक मॅथ्सचा पेपर अवघड आणि खूप विस्तृत होता. दोन्ही पेपरमध्ये फरक लक्षणीय असल्याचे मत देशभरातील बहुतेक शिक्षकांनी मांडले. अपवाद वगळता विद्यार्थ्यांनाही बेसिक मॅथ्सचा पेपर खूपच अवघड होता, अशी प्रतिक्रिया नोंदवली.

Comments are closed.