केंद्र सरकारने स्टँड-अप इंडिया योजना 2031 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर. स्टँड-अप इंडिया योजना 31 मार्च 2031 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा उद्देश महिला, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यातील उद्योजकतेला चालना देणे आहे.
Comments are closed.