Central minister nitin gadkari apologize publicly for nagpur airport runway recarpeting work


नागपूर : आपल्या वेगवान आणि दर्जेदार कामांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूरकरांची माफी मागितली. कामाला होत असलेल्या विलंबामुळे नागपूरकरांना भूर्दंड पडत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांची माफी मागितली आहे. (central minister nitin gadkari apologize publicly for nagpur airport runway recarpeting work)

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना विमान तिकिटाचे अतिरिक्त दर द्यावे लागत आहेत, याचे मला वाईट वाटते. आणि यासाठीच मी नागपूरकरांची माफी मागतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवली.

– Advertisement –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी विमानतळ प्राधिकरण आणि मिहान अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, मी स्वतः एक लाख कोटींचा 1370 किमीचा मुंबई – दिल्ली महामार्ग दोन वर्षांत बांधला. आणि तीन किमीच्या रनवेसाठी तुम्हाला दीड वर्ष लागतंच कसं, अशी विचारणा देखील त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम

– Advertisement –

अनेक दिवसांपासून विमानतळ धावपट्टीचे काम प्रलंबित आहे. 2024 च्या मे महिन्यात के.जी. गुप्ता कंपनीला रनवे रिकार्पेटिंगचं काम दिलं. रनवे रिकार्पेटिंगच्या या कामामुळे विमान कंपन्यांनी आपले शेड्युल बदलले, परिणामी, विमान तिकिटांचे दर वाढले. नागपूरमधील उड्डाणांवर याचा परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळेच लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करा, असे आदेश नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. आता या कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी महिन्याभराचा वेळ दिला आहे. आता काम वेळेत न केल्यास संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे.

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे तरीही मोकाटच…दमानिया आक्रमक

1370 किमीचा एक लाख कोटींचा मुंबई – दिल्ली महामार्ग मी दोन वर्षांत पूर्ण केला आणि तीन किमीच्या रनवेसाठी तुम्हाला दीड वर्ष लागतं, हे हास्यास्पद आहे. 2024 च्या मे महिन्यात के.जी. गुप्ता या कंपनीला काम देण्यात आले. यात रनवे रिकार्पेटिंगचं काम देखील आहे. मात्र कंत्राटदाराकडे पुरेशी यंत्रणा नाही. खरं तर हे केवळ आठवड्याभराचे काम आहे. त्यातही काम न होण्यासाठी कंत्राटदाराने निवडणुकीचे कारण दिले. पण निवडणुकीसाठी केवळ 10 दिवस गेल्याचेही गडकरी म्हणाले. दरम्यान, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती देखील नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar





Source link

Comments are closed.