मध्य रेल्वे मार्गावर लोकल प्रवाशांचे मेगाहाल
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना रविवारच्या मेगाब्लॉकने मोठा मनस्ताप दिला. मेन लाईनसह हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या लोकल फेऱयांचे वेळापत्रक संपूर्ण दिवसभर विस्कळीत राहिले. ब्लॉक संपल्यानंतरही लोकल उशिराने धावल्या. अनेक फेऱया आयत्या वेळी रद्द करण्यात आल्या. यात प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.
ऐन उकाडय़ात प्रचंड हाल झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी मेन लाईनवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर तसेच पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवर ब्लॉक घेतला होता. मध्य रेल्वेच्या सर्व मार्गिकांवर ब्लॉक राहिल्यामुळे अपच्या दिशेने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने चाललेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
Comments are closed.