Central Railway – ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, आंबिवली-टिटवाळा दरम्यान गवताला आग

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. आंबिवली-टिटवाळा या स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असलेल्या गवताला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सिग्नल यंत्रणेची केबल जळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोणातून रेल्वे काही वेळ थांबवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या दरम्यान आंबिवली आणि टिटवाळा या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या गवताला मोठी आग लागली. आग लागल्यामुळे या आगीत सिग्नल यंत्रणेची केबल जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून गाड्या 15 ते 20 मीनिटे उशीराने धावत आहेत.

Comments are closed.