केंद्राने 'अधिकृत गाड्यांवर' निर्बंध लादले

अतिरिक्त प्रभारात मिळणार नाही वाहन : महिन्याला केवळ 250 लिटर इंधन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्र सरकारमध्ये ‘साहेबा’च्या स्टाफ कार’वर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. ऊर्जा संकटादरम्यान जारी या दिशानिर्देशांचे मुख्य कारण शासकीय वाहनांच्या दुरुपयोगाला रोखणे आहे. केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालये, विभाग, अधीनस्थ कार्यालये, स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये स्टाफ कारच्या दुरुपयोगाची प्रकरणे समोर येत आहेत. याचमुळे अर्थ मंत्रालयाने खर्च विभागाच्या सहमतीने स्टाफ कारच्या वापरावरून नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.  अतिरिक्त प्रभारादरम्यान  अधिकाऱ्याला एकच कार मिळणार आहे. सरकारी उपक्रमांच्या वाहनांचा वापर अधिकारी स्वत:साठी करू शकणार नाही. निश्चित किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास कारने केल्यास नियमांनुसार संबंधित अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्यात येणार आहे. एक महिन्यात स्टाफ कार 500 किलोमीटरच धावू शकणार आहे. स्टाफ कारच्या वापरासाठी सर्व निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारमधील कुठलाही अधिकारी स्वत:च्या नियमित पदासाटी अधिकृत कारचा वापर करत असल्यास त्याला अतिरिक्त प्रभाराकरता अतिरिक्त वाहन उपलब्ध करविण्यात येणार नाही.  केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा स्वत:साठी वापर करता येणार नाही. परंतु विभागांच्या दौऱ्याकरता स्टाफ कारचा वापर करता येणर आहे. एक महिन्यात स्टाफ कारसाठी 250 लिटरपेक्षा अधिक इंधन उपलब्ध केले जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकारी दर आठवड्याला वाहनाचे रजिस्टर तपासणार आहे. स्टाफ कारसाठी निर्धारित इंधनमर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास वित्तीय सल्लागाराच्या सहमतीने प्रशासकीय सचिवाची मंजुरी मिळवावी लागणार आहे.  सरकारी विभागाला भाडेतत्वावरील वाहनांसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिव किंवा त्याहून वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख आणि वरिष्ठ प्रशासकीय दर्जा तसेच त्याहून अधिक वेतनयुक्त रँकमध्ये सामील अधिकाऱ्यांना स्टाफ कारची सुविधा मिळते.

स्टाफ कारवर राहणार नियंत्रण

स्टाफ का अप्पर सचिवापेक्षा खालील पदाच्या प्रशासकयी अधिकाऱ्याच्या नियंत्रणात राहणार नाही. या रँकपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडेच कारचे नियंत्रण राहणार आहे. हाच अधिकारी कारचा योग्य वापर, त्याची देखभाल आणि दुरुस्तीसाठी जबाबदार असणार आहे. नियंत्रण अधिकारी एक लॉग बुक सांभाळणार आहे.

Comments are closed.