MPL 2025: एमपीएल शतकांचा पहिला मान 'या' दोघांचा! गहुंजेवर केलेली षटकारांची बरसात
MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात 4 जून रोजी होईल. महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्यासाठी एमसीए सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आज आपण स्पर्धेच्या पहिल्या यशस्वी हंगामातील शतकवीरांविषयी जाणून घेणार आहोत.
(एमपीएल 2023 पासून शताब्दी)
एमपीएल 2023 मध्ये दोन खेळाडूंनी शतक साजरे केले होते. अनुभवी अंकित बावणे (Ankeet Bawane) हा एमपीएल इतिहासात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरलेला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघासाठी खेळताना अंकित याने साखळी फेरीत रत्नागिरी जेट्स संघाविरुद्ध हे शतक पूर्ण केलेले. अंकितने हे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 59 चेंडू घेतले होते. विजयासाठी मिळालेल्या 175 धावांचा पाठलाग करताना त्याने एक बाजू लावून धरताना 60 चेंडूंमध्ये नाबाद 105 धावा केलेल्या.
अंकितने आपल्या या खेळी दरम्यान 11 चौकार व 4 षटकारांचा पाऊस पाडलेला. हे शतक एमपीएल इतिहासातील सर्वात संथ शतक आहे. असे असले तरी, अंकित याने त्या हंगामात धावांचा अक्षरशः रतीब घातला होता. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी ऑरेंज कॅप पटकावलेली. या हंगामात त्याच्या नावावर 7 सामन्यांमध्ये 362 धावा होत्या. (MPL 2025 Entry Free)
एमपीएलच्या पहिला हंगामातील दुसरे शतक युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याच्या बॅटमधून आले होते. ईगल नाशिक टायटन्स संघाचा सलामीवीर म्हणून त्याने पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध 46 चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा करून दाखवला होता. बाद होण्यापूर्वी त्याने 54 चेंडूत 117 धावांची वादळी खेळी केलेली. यामध्ये 10 गगनचुंबी षटकार सामील होते. (Centurions in First MPL 2025 Matches – Full List of Century Scorers)
एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कल्पनेने सुरू झालेल्या या स्पर्धेचा तिसरा हंगाम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे 4 जून ते 24 जून या काळात सहा संघांदरम्यान रंगणार आहे. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा देखील पहिला हंगाम खेळला जाईल. या दोन्ही स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसेच Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर केले जाईल. तसेच, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. (MPL 2025 Live Telecast on JioHotstar OTT and Star Sports 2 TV Channel)
Comments are closed.