शतक झळकवल्यानंतरही ऋतुराज गायकवाडचं भारतीय संघातील स्थान धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण!
ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदाच वनडे (ODI) संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत तो संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि फक्त 8 धावा करून बाद झाला. मात्र, रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने 83 चेंडूंमध्ये 105 धावांची शतकी खेळी करत सामना गाजवला. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या शतकानंतरही गायकवाडचे प्लेइंग इलेव्हनमधले स्थान पक्के होण्याची शक्यता खूपच कमी आहे. याचे कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय वनडे संघाची घोषणा झाली, तेव्हा त्यात कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) नव्हते. गिल दुखापतीमुळे बाहेर असल्याने, त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) सलामीला खेळण्याची संधी मिळाली. दुसरीकडे, उपकर्णधार श्रेयस अय्यर नंबर-4 वर खेळतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये या चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) संधी मिळाली होती. पण जेव्हा अय्यर संघात परत येईल, तेव्हा गायकवाडचे प्लेइंग इलेव्हनमधले स्थान धोक्यात येईल.
भारतीय संघात पहिली पाच फलंदाजीची स्थाने जवळपास निश्चित (पक्की) आहेत. यावर रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल खेळतात. फलंदाजीसाठी फक्त सहावा नंबर-6 शिल्लक राहतो, कारण सातव्या क्रमांकावर (नंबर-8) सामान्यत अष्टपैलू (All-rounder) खेळाडू खेळतो.
वॉशिंग्टन सुंदरला सातत्याने मिळत असलेल्या संधींमुळे आणि रवींद्र जडेजा संघात असल्यामुळे, सहाव्या क्रमांकावरही ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकणार नाही. या सर्व बाजूंचा विचार केल्यास, रायपूरमध्ये 105 धावांची शतकी खेळी करूनही गायकवाडचे प्लेइंग इलेव्हनमधले स्थान सुरक्षित नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. श्रेयस अय्यर दुखापतीतून परतल्यानंतर गायकवाडला बाहेर बसावे लागू शकते.
Comments are closed.