औषध खरेदीत चार कोटींची अनियमितता, सभापतींचे चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या औषध खरेदी प्रकियेत तब्बल चार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केला. या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सभापती राम शिंदे यांनी दिले.

नाशिक जिल्हा रुग्णालयात झालेल्या औषध घोटाळा खरेदीबाबत आमदार पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. 2024-25 मध्ये झालेल्या या औषध खरेदीवर तत्कालीन अधिकाऱ्यांनी फाईलवर आक्षेप नोंदवले होते. तरीही एकाच कंपनीकडून बहुतांश औषधांची खरेदी केली. त्यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी दिलेल्या निविदा क्रमांक आणि प्रत्यक्ष पुरवठा आदेशातील क्रमांकात मोठी तफावत आढळून आली. तसेच निविदेला अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच घाईघाईने खरेदी प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप केला. यावर आरोग्य विभागाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापतींनी दिले.

Comments are closed.