चमारी अट्टापट्टूने वनडे मध्ये रचला इतिहास, असं करणारी पहिली श्रीलंकन खेळाडू ठरली

चामारी अटापट्टूच्या नेतृत्वाखाली, श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने अखेर 2025च्या विश्वचषकात विजयाची चव चाखली. सलग पाच पराभवांना सामोरे गेल्यानंतर, श्रीलंकेच्या संघाने एका रोमांचक सामन्यात बांगलादेशचा 7 धावांनी पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. या विजयासह कर्णधार चामारी अटापट्टू फलंदाजीने इतिहास रचला.

अटापट्टू एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली श्रीलंकेची महिला फलंदाज ठरली. बांगलादेशविरुद्धच्या 21व्या सामन्यात तिने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ही ऐतिहासिक कामगिरी केली. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या अटापट्टूने आतापर्यंत 120 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4045 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 9 शतके आणि 20 अर्धशतके आहेत. 2003 ते 2019 दरम्यान 118 सामन्यांमध्ये 2029 धावा काढणाऱ्या श्रीलंकेच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शशिकला सिरीवर्धने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय सामन्यात 4000 पेक्षा जास्त धावा काढणारी अटापट्टू ही चौथी आशियाई महिला खेळाडू आहे.

नवी मुंबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात खराब झाली, विश्मी गुणरत्ने पहिल्याच चेंडूवर बाद झाली. अटापट्टूने हसिनी परेरासोबत दुसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडत डाव सावरला. हसिनी परेराने 85 धावांची शानदार खेळी केली. श्रीलंकेला 202 धावांच्या सन्माननीय धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, बांगलादेश चांगल्या स्थितीत होता, परंतु शेवटच्या षटकात सामना पूर्णपणे उलटला.

बांगलादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती आणि कर्णधार नाहिदा सुलताना क्रीजवर होती. त्यानंतर चामारी अटापट्टूने कर्णधारपद आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तिने शेवटच्या षटकात सलग चार चेंडूत चार बळी घेत सामना लंकेच्या बाजूने फिरवला. राबिया खान पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाली, नाहिदा अख्तर दुसऱ्या चेंडूवर रनआउट झाली. सुलताना तिसऱ्या चेंडूवर निलक्षिका सिल्वाने झेलबाद केली आणि चौथ्या चेंडूवर मारुफा अख्तर एलबीडब्ल्यू झाली. या षटकात श्रीलंकेला शानदार आणि ऐतिहासिक विजय मिळाला.

Comments are closed.