Champions Trophy 2025 – पराभव जिव्हारी लागला, ‘या’ खेळाडूने कर्णधारपदाचा दिला राजीनामा

पाकिस्तानात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून यजमान पाकिस्तानसह, बांगलादेश आणि इंग्लंड या संघांचा पत्ता कट झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांना साखळी फेरीत एकही सामना जिंकता आला नाही. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धुळ चारली, तर दुसऱ्या सामन्यात अफगानिस्तानने त्यांना पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडचा संघ सेमी फायनलच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. अशातच इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या कर्णधारपदाचा (वनडे आणि टी-20) राजीनामा दिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्य जोस बटलरचा खेळ अगदीच सुमार राहिला होता. तसेच खराब कामगिरीमुळे संघ सुद्धा स्पर्धेतून बाहरे फेकला गेला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कप 2022 उंचावला होता. त्यानंतर वनडे वर्ल्डकप 2023 च्या सेमी फायनलपर्यंत संघाने मजल मारली होती. त्यानंतर मात्र संघाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 मध्येही संघाचा खेळ निराशाजनक होता. आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संघाची पाटी कोरी राहिली आहे. त्यामुळे जोस बटलरने वनडे आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचे शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Comments are closed.