Champions Trophy 2025 – चाहत्यांना धक्का! बुमराह आणि यशस्वी स्पर्धेतून बाहेर; हर्षित राणाची संघात निवड
![jasprit bumrah](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/jasprit-bumrah-696x447.jpg)
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघाची यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरेल. परंतु दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम बसला असून जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाची संघात निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर यशस्वी जयस्वालला सुद्धा संंघातून वगळण्यात आले आहे. यशस्वी जयस्वालसह शिवम दुबे आणि मोहमद सिराज यांचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे.
🚨 बातम्या 🚨
फास्ट गोलंदाज जसप्रिट बुमराहला मागील पाठीच्या दुखापतीमुळे 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून नाकारण्यात आले आहे. हर्शीट राणाचे नाव बदलले.
इतर पथक अद्यतने 🔽 #Teamindia | #चॅम्पियन्सस्ट्रॉफी https://t.co/rml5i79gkl
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 11 फेब्रुवारी, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहमद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
Comments are closed.