'भारताला प्रवासाचा थकवा नाही, त्यामुळे त्यांना स्पर्धेत मोठा फायदा'- पॅट कमिन्स
दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टीम इंडियाबद्दल मोठा दावा केला आहे. हायब्रिड मॉडेलनुसार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दुबईतील एकाच मैदानावर खेळण्याचा भारताला फायदा आहे. तर इतर संघांना त्यांचे गट टप्प्यातील सामने पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी खेळावे लागतील, असा पॅट कमिन्सचा विश्वास आहे. काही संघांनाही दुबईला जावे लागते. त्याच वेळी, टीम इंडियाला प्रवासाबाबत फारशी अडचण नाही. कारण त्यांना हॉटेलमधून थेट स्टेडियमवर तर पोहोचावे लागते.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने स्पर्धेचे यजमान पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर, हायब्रिड मॉडेल अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अंतिम फेरीत पोहोचला तर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनाही दुबईमध्ये खेळवला जाईल. सध्या तरी, टीम इंडियाने शेवटच्या लीग सामन्यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाला 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर 4 मार्च रोजी संघाचा सेमीफायनल सामना होणार आहे.
पॅट कमिन्सने मीडियाशी बोलताना म्हणाला, “ही स्पर्धा हायब्रिड माॅडेल अंतर्गत आयोजित केली जात आहे हे खूप छान आहे, परंतु अर्थातच यामुळे त्यांना (भारताला) त्याच मैदानावर खेळण्याचा मोठा फायदा मिळतो. त्यांचा संघ आधीच खूप मजबूत आहे आणि त्यांना त्यांचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळण्याचा स्पष्ट फायदा होत आहे.” भारताने पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर तिसरा सामना 4 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाईल. जर टीम इंडियाने सेमीफायनल सामना जिंकला तर फायनल देखील याच मैदानावर होईल. पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा-
न्यूझीलंडचा वादळी खेळ! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकांचा पाऊस
वनडे क्रिकेटमध्ये मी विराट कोहलीपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही… ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराचा दावा
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडल्याने पीसीबी अॅक्शन मोडवर, हेड कोचची हकालपट्टी होणार
Comments are closed.