जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला घेतलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडिया: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. मात्र त्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जसप्रीत बुमराहऐवजी वेगान गोलंदाज हर्षित राणाचा (Harshit Rana) संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत एक पत्रक काढत माहिती दिली.

सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्याबाबतही बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यशस्वी जैस्वालला राखीव खेळाडूच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वालच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला संघात निवडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी काही दिवसांआधीच बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला होता. यावेळी 15 सदस्यीय संघात यशस्वी जैस्वालला स्थान देण्यात आले होते. परंतु आता त्याला 15 सदस्यीय संघातून काढून त्याच्याजागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नेमकं काय घडलं?, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात 12 फेब्रुवारीपर्यंत अंतिम बदल करण्याची मुदत आयसीसीने सर्व संघांना दिली होती. यानुसार भारताने मंगळवारी (11 फेब्रुवारी) रात्री उशीरा आपला अंतिम संघ जाहीर केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ (Team India Squads Champions Trophy 2025)-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती

संबंधित बातमी:

मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ

https://www.youtube.com/watch?v=4MBT3HF7WEO

अधिक पाहा..

Comments are closed.