चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी

शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार यावेळी पाकिस्तान आणि यूएईमध्ये रंगणार आहे. भारताचे सर्व सामने यूएईच्या भूमीवर खेळवले जातील. तर पाकिस्तानमध्ये, आगामी स्पर्धेचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. सर्व संघांनी आधीच त्यांचे संघ जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत, आयसीसीने भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याची आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

धवन व्यतिरिक्त, आयसीसीने धवनसह एकूण चार खेळाडूंना सदिच्छादूत म्हणून निवड झाली असून यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराड़ा अहमद, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी यांचा समावेश आहे.

आयसीसीने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये शिखर धवन म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणे ही एक खास भावना आहे आणि राजदूत म्हणून आगामी स्पर्धेचा आनंद घेणे हा एक मोठा सन्मान आहे. ही एक खास स्पर्धा आहे आणि माझ्या अनेक आठवणी त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. धवनने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला आणि दोन्ही वेळा गोल्डन बॅट (स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जाणारा पुरस्कार) जिंकला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोनदा गोल्डन बॅट जिंकणारा शिखर धवन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. या सलामीवीर फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक 701 धावा केल्या आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले. त्यानेळी त्याने पाच सामन्यांमध्ये 363 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक होते. भारताला 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून देण्यात त्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दुसरीकडे, सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला होता. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर होत आहे आणि ही स्पर्धा जिंकण्याचा मोठा दावेदारही आहे.

हे ही वाचा –

Gautam Gambhir : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंग कोण करणार? गौतम गंभीरच्या वक्तव्यामुळे ऋषभ पंतची उडाली झोप; कोच नक्की काय म्हणाला….

अधिक पाहा..

Comments are closed.