Champions Trophy – अफगानिस्तानच स्वप्न धुळीस, दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनलमध्ये प्रवेश; हिंदुस्थानविरुद्ध भीडणार?

अफगानिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले होते. परंतु आज सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंड या सामन्यात इंग्लंडने मोठी धावसंख्ये केली असती, तर अफगानिस्तानला सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारण्याची संधी निर्माण झाली असती. परंतु इंग्लंडचा संघ 179 धावांमध्ये गार झाला. त्यामुळे गट ‘ब’ मधून दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवेशामुळे सेमी फायनलचे चार संघ निश्चीत झाले आहे. हिंदुस्थान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी आपापसात भीडतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ आपापसात भीडणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. रविवारी (2 मार्च 2025) हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. त्यानंतर सेमी फायनलचं गणित स्पष्ट होईल. सध्या गट ‘अ’ मध्ये न्यूझीलंड 0.863 चा नेट रनरेट आणि 4 अंकांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच हिंदुस्थान 0.647 चा नेट रनरेट चार अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे गट ‘ब’ चे गणित बदलण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकने इंग्लंडचा पराभव केल्यास दक्षिण आफ्रिका पहिला नंबर प्राप्त करेल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
Comments are closed.