अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला तर, कोणता संघ ठरणार चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता? जाणून घ्या आयसीसीचा निर्णय

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. तसेच भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिका संघाला हरवले होते. जर अंतिम सामन्यात पावसाच सावट आलं तर चाहत्यांसाठी ही अत्यंत निराशेची बाब असेल. पण जरी पाऊस पडण्याची शक्यता असली तरी त्याआधीच आयसीसीने अंतिम सामन्यासाठी काही नियम लागू केले आहेत.

जर अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर काही षटके कमी करून सामना खेळवला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार अंतिम सामना कमीत कमी 20 षटकांत खेळण गरजेच आहे. त्यामुळे दोन्ही संघाला 20 षटके देण्यात येतील. जर पावसामुळे 9 मार्च रोजीचा हा सामना रद्द करण्यात आला, तर तो राखीव ठेवण्यात आलेल्या दिवशी आयोजित केला जाईल. 10 मार्च अंतिम सामन्याचा राखीव दिवस आहे.

जर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीचा झाला तर विजयी संघाचा निर्णय सुपर षटकांतून घेतला जाईल. सुपर षटकाच्या नियमानुसार दोन्ही संघांना एक- एक षटक खेळण्याची संधी देण्यात येईल.

भारतीय संघाने स्पर्धेतील सगळे साखळी सामने जिंकले आहेत. संघाने पहिल्यांदा बांगलादेश नंतर पाकिस्तान तसेच न्यूझीलंडचाही पराभव केला. भारताने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 250 धावांचं लक्ष्य दिले होते. पण धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे 205 धावातच पूर्ण खेळाडू बाद झाले. भारतासाठी वरुण चक्रवर्तीने घातकी गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट्स घेतल्या. आता दोन्ही संघ अंतिम सामन्यात समोरासमोर येतील.

हेही वाचा

रोहित, विराट की पॉंटिंग? ICCच्या फायनलमध्ये कोण आहे सगळ्यात भारी?

SA VS NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या उपांत्य सामन्यात झाले 5 अभेद्य विक्रम, किवींचा अष्टपैलू खेळ!

आयसीसी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताला दोनदा दणका, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड!

Comments are closed.