तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण मालक आमच्याकडे! चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून सत्ताधाऱ्यांमध्येच निधीवरून वाकयुद्ध रंगले आहे. तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला होता. यावर आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्यात तरी मालक आमच्याकडे, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. कोल्हापुरातील गडहिंग्लज येथे ते बोलत होते.

तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे की आणखीन कुणाकडे असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे…कारण समोरचे उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याआधी भोरमध्येही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना डिवचले होते. भोरमध्ये अजित पवारांचे सरकार असले तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत, असे ते म्हणाले होते.

तुमच्या हातात मत द्यायचं आहे पण निधी देणे माझ्या हातात आहे! अजितदादांचा मतदारांना दम

Comments are closed.