चंद्रकांत पाटलांनी केली पडळकरांची पाठराखण; म्हणाले जयंत पाटील भाजपात आले तर ज्युनियर, गोपीचंद स
सांगली : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना डिवचलं आहे. सांगलीमध्ये जयंत पाटलांना (Jayant Patil) भाजपमध्ये घेऊ नका अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाषणातून चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास गोपीचंद पडळकर त्यांना सिनिअर राहतील. तसेच, जयंत पाटील यांना पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यापूर्वीच जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर भाष्य केले होते. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजप प्रवेशानंतर या जिल्ह्यात जयंत पाटील (Jayant Patil) ज्युनियर आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) त्यांना सिनिअर असतील, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत.
इथून पुढे आपल्याला अरे म्हणणाऱ्याला कारे करण्याची आपली तयारी पाहिजे. सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी लावा, त्याचबरोबर इतरही चार घोटाळ्याच्या मागे आपण लागू आणि पाच गोष्टींची चौकशी सुरू करू आणि वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही रावण जाळून या विकृतीचा नाश करीत आहोत, उद्यापासून सांगली जिल्ह्यात शांतता पाहिजे, शांतता बाळगण्याचा आम्ही काय ठेका घेतला नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Chandrakant Patil: पाच घोटाळ्यांची चौकशी केली तर हे आपापल्या गावातून पळून जातील
पुढे बोलताना पाटील म्हणाले, अरे म्हणणाऱ्याला का रे म्हणायला पाहिजे, आपल्या सर्वांची तयारी पाहिजे. मी पाच घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी पात जणांवर देणार आहे, सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या त्या वेळच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं, दर आठवड्याला ते मंत्रालयात पाहिजेत आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ पण या घोटाळ्याची चौकशी होणार. दुसरीकडे सम्राट महाडिकांनी सर्वोदय कारखान्यासाठी जिवाचा रान करायचा आहे, सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही ते बघू. लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखांवर, मी ते बिल्डरच्या डायरीचं प्रकरण पाहतो, पाच घोटाळे आहेत. पाच घोटाळ्यांची चौकशी केली तर ते आपापल्या गावातून पळून जातील. त्यांना जेलमध्ये जावं लागेल म्हणून ते गावातूनच पळून जातील, तो इशारा देण्यासाठी मी इथे उभा आहे, आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशारा देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मी दहा टक्केच बोललो आहे असे पुढे ते म्हणालेत.
Chandrakant Patil: जिल्ह्यात जयंत पाटील पडळकर यांना ज्युनिअर राहतील…
तर काहीजण भाषण करताना म्हणतात जयंतराव पाटलांना भाजपमध्ये आणण्यासाठी दडपण आणत आहात, जयवंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात ते माहितीये, गोपीचंद पडळकर म्हणाले त्याप्रमाणे राजकारण आहे, जयंत पाटील भाजपात आले तर त्यांना मागे बसायला लागेल, ते येणार नाहीत. ते येणार नाहीत पण आले तर त्यांना असं म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ही आमची घोषणा आहे ना, ते भाजपात आले तर या जिल्ह्यात ते पडळकर यांना ज्युनिअर राहतील, आणि गोपीचंद सीनियर राहतील. त्यामुळे त्यांना असं म्हणावं लागेल, चंद्रकांत पाटलांनी हे बोलताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला, त्यांना शांत करत पाटील म्हणाले अरे ते पक्षात तरी येऊ देत, तुम्हाला आनंद होईल. कारण ते पडळकर यांच्या मागे बसतील आणि म्हणतील गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तुम्हाला काय अडचण आहे काय माहिती.
Chandrakant Patil: जयंतरावांचा फोन आला अन…
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले मी जाहीरपणे बोलतो मी कोणाला घाबरत नाही. जयंतरावांचा मला फोन आला, जाऊद्या ना संपवा ना, मी म्हटलं वार झाला तर प्रतिवार होणार. तो प्रतिवार झाला. सदाभाऊ खोत यांनी जे काही बोलले त्यातून आज परतफेड झाली आहे. त्यांचा एक पिल्ला असा म्हणाला या सभेत काही जर बोललात तर परिणाम चांगले होणार नाहीत, आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही बांगड्या भरल्या आहेत का? हे बोलताना मला महिलांबद्दल काही बोलायचं नाही. पण हे सांगायचं की आम्ही त्यांचे वंशज आहोत ज्या देवींनी आशीर्वाद दिलाय पण प्रत्येकीच्या हातामध्ये शस्त्र आहे, मी माझ्या माता-भगिनींची माफी मागण्यासाठी, हवं तर म्हणा आम्ही काय शेपूट घातला आहे का? असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
https://www.youtube.com/watch?v=OGUU16EZQY4
आणखी वाचा
Comments are closed.