Chandrapur News – कचरा संकलन करणाऱ्या कंपनीने पेव्हर ब्लॉक लांबवले, तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांचे कारवाईचे अश्वासन

चंद्रपुरातील कोहिनूर मैदानात वॉकिंग ट्रॅकवर लावलेले पेव्हर ब्लॉक (गट्टू) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही चोरी दुसऱ्या कुणी नाही, तर महापालिकेचे कचरा संकलन करणाऱ्या कंपनीने केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या प्ररकरणाची तक्रार करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोहिनूर स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये नागरिकांना पायी चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता आणि त्यावर गट्टू बसवण्यात आले आहेत. हे स्टेडियम सध्या महापालिकेच्या अधिनस्त आहे. या स्टेडियमचे सौंदर्यीकरण, देखभाल महापालिकाच करते. याच स्टेडियममधील वॉकिंग ट्रॅकचे गट्टू काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आम आदमी पक्षाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार बघितला. तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
हे पेव्हर ब्लॉक चोरांनी लांबवले नाही, तर शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट मिळालेल्या अर्बन enviro कंपनीच्या लोकांनी लांबवले. इतकेच नाही तर हे गट्टू या कंपनीने आपल्या कार्यालयाच्या प्रांगणात सजवले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर कंपनी या प्रकरणाची सारवासारव करीत आहे. कंपनीने सांगितले की, महाकाली यात्रेला आलेल्या भाविकांनी हे गट्टू काढून चुली तयार केल्या होत्या. त्यामुळे ते आम्ही उचलून आणले, अशी सफाई कंपनी देत आहे. तथापि, या प्रकरणाची तक्रार ‘आप’ने मनपाला केली असून, आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे जिल्हा संयोजकांनी सांगितले.
Comments are closed.