Chandrapur Municipal Election – चंद्रपुरात शिवसेना आणि वंचित एकत्र लढणार, दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केली युतीची घोषणा

चंद्रपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती जाहीर झाली आहे. आज (28 डिसेंबर 2025) दोन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परीषद घेत महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे आणि वंचितचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. स्थानिक पातळीवर युती करण्याचे स्वातंत्र्य पक्षांनी दिले आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे यावेळी दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शिवसेना आणि वंचित यांच्या युतीच्या घोषणेमुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात. काही दिवसांपूर्वी वंचितसोबत काँग्रेसची बोलणी सुरू असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र, आता शिवसेना आणि वंचितची युती झाल्यामुळे काँग्रेससोबतच्या युतीवरील चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Comments are closed.