Chandrapur जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, वर्षभरात 42 हत्या, 52 हाप मर्डर; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2024 या वर्षात 42 हत्या झाल्या आहेत. तर 52 हाप मर्डरच्या घटना घडल्या आहेत. चालू वर्षातील दोन महिन्यात तीन हत्या, तीन हॉप मर्डरच्या घटना पुढे आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समोर आलेले आकडे धडकी भरविणारे आहेत. असे असताना मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी जिल्हातील कायदा, सुव्यवस्था उत्तम असल्याचे म्हटले आहे. सोबतच पोलीस प्रशासनाचा कामागिरीवर त्यांनी शाबासकीची थाप दिली.
चंद्रपूर जिल्हा म्हटलं डोळ्यापुढे उभा असतो ताडोबाचा हिरवागार परिसर. येथे असलेले वाघ, दुर्मिळ वन्यजीव. ब्लॅक गोल्ड सिटी अशी ही या शहराची ओडख. शांत जिल्हा म्हणून प्रचलित असणाऱ्या या जिल्ह्यात मात्र काही वर्षांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. गोळीबार, हत्या, दरोडे, चोरीचा घटनांच्या आलेख चढता आहे. मागील दोन वर्षाचे आकडे पुढे आले आहेत. आकडे बघितल्यावर हा चंद्रपूरच काय? असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. 2023 या वर्षात हत्येचा 31 घटना घडल्या होत्या. तर हाफ मर्डरचा 50 घटना पुढे आल्यात. खरंतर 2024 मध्ये यात घट व्हायला हवी होती. मात्र घडलं उलट. 2024 मध्ये हत्येचा घटनेत वाढ झाली. एकूण 42 हत्येचा घटनांनी चंद्रपूर हादरलं, तर हाफ मर्डरचा 52 घटना घडल्यात. 2025 मध्ये केवळ जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात तीन हत्या आणि तीन हाप मर्डर झाले आहेत. चंद्रपूरातील वाढती गुन्हेगारी बघता आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. किमान पुढील दहा महिन्यात गुन्हेगारीचा वाढत्या आलेखाला उतरती कळा लागेल अशी माफक अपेक्षा चंद्रपूरकरांची आहे.
Comments are closed.