Chandrapur news – वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या शंकरपूर येथे वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे (वय – 52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ईश्वर भरडे हे शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शेतावर जाऊ पाहणी केला असता तिथे रक्ताचे डाग आणि फाटलेले कपडे आढळले. तिथून थोड्याच अंतरावर भरडे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा होत्या आणि हाताचा एक भागही वाघाने खाल्ला होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वाघ पकडण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली.

…तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही

गावकऱ्यांनी ईश्वर भरडे यांचा मृतदेह उलचून आणून शंकरपूर भिसी रस्त्यावरील आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टवर ठेवला. जोपर्यंत वाघाला ठार मारण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली. यामुळे वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनाकडून गावकऱ्यांची समजूत काढली जात आहे.

Comments are closed.