Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे युवकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सदर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे या पाच युवकांचा समावेश आहे. हे सर्व युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Comments are closed.