Chandrapur News – लेकीच्या उपचारांसाठी आई-वडिलांचं धाडस, पुराच्या पाण्यातून काढली वाट

मुलांच्या सुरक्षेसाठी आई-वडिलांच्या धाडसाचे अनेक किस्से तुम्ही एकले असतील. अनेक चित्रपटांमध्ये किंवा प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा अनुभव तुम्हाला आला असेल. याचीच प्रचिती आता चंद्रपूर जिल्ह्यात आली आहे. तीन वर्षांची मुलगीला ताप आला होता. परंतु मुलीवर उपचारांसाठी गावात दवाखाना नाही. मुसळधार पावसामुळे गावाला चहूबाजूने पुराणे वेढलंय. अशा परिस्थितीत आई-वडिलांनी जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यातून वाट काढली आणि मुलीला रुग्णालयात नेलं. सध्या त्यांच्या या धाडसाच सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इरई नदीला पुर आला आहे. यामुळे चारवट गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गावाला अक्षरश: बेटाचे स्वरुप आले आहे. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अशातच गावातील श्वेता आणि आशिष धोबे यांची तीन वर्षांची मुलगी अधिरा चार दिवसांपासून तापाने त्रस्त होती. गावात रुग्णालय नसल्यामुळे तिची तब्बेत खालावत चालली होती. याच दरम्यान पुराचे पाणी थोडे कमी होताच आशिष आणि श्वेता यांनी गावातील रवी थिपे यांच्या मदतीने इरई नदीवर बांधलेला पूल ओलांडला. मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि गुडघाभर पाण्यातून नदी ओलांडली. मुलीसाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाच आता जिल्ह्यात कौतुक होत आहे.
Comments are closed.