नीट परीक्षेत 99 टक्के गुण, पण डॉक्टर व्हायचे नव्हते; MBBS ला प्रवेश घेण्याआधीच विद्यार्थ्याने स्वतःला संपवले

नीट परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवले. मात्र डॉक्टर व्हायचे नसल्याने 19 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. अनुराग अनिल बोरकर असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नवरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहेत.

अनुराग बोरकर याने नीट यूजी 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक झाले होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले. आपल्याला डॉक्टर व्हायचे नसल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

Comments are closed.