Chandrapur news – जैन मंदिरातील दानपेटी फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद; भद्रावती पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये असलेल्या प्रसिद्ध जैन श्वेतांबर मंदिराची दानपेटी फोडण्यात आली. मंदिरातील दानपेटी फोडून चोरांनी 10 हजार रुपये लंपास केले. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भ्रद्रावती पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Chandrapur news – जैन मंदिरातील दानपेटी फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद; भद्रावती पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या pic.twitter.com/lC0VcYrl6A
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 20 जानेवारी 2026
भ्रद्रावती शहरामध्ये प्रसिद्ध जैन श्वेतांबर मंदिर आहे. या मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरांनी मंदिरातील दानपेटी फोडून 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी आले असता चोरी घटना उघडकीस आली.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी फोडलेली असल्याचे पुजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापकांना याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता चोरीची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले. शुभम झाडे (व – 27) आणि ऋतिक जांभूळकर (वय – 25) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Comments are closed.