Chandrapur News विद्यार्थिनीस मानसिक त्रास दिल्या प्रकरणी प्राध्यापकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
विद्यार्थिनीस मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणात महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात तळोधी गावातील महाविद्यालयातील घटना आहे.
या महाविद्यालयातील दोन प्राध्यापक एका विद्यार्थिनीस नेहमीच मानसिक त्रास देत होते. अन्य विद्यार्थिनींसमोर तिला अपमानित करणे, तिच्या आणि तिच्या आईच्या चारित्र्याबद्दल अन्य विद्यार्थ्यांना विचारण्याचे काम हे प्राध्यापक करीत होते. या प्रकाराने ती विद्यार्थिनी त्रस्त होती. तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी महाविद्यालयात येऊन दोन्ही प्राध्यापकाना मुलीस त्रास देणे थांबवा असे सांगितले. मात्र, त्यानंतरही प्राध्यापकांकडून मुलीस त्रास दिला जात होता. शेवटी कंटाळून विद्यार्थिनीने दोन्ही प्राध्यापकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दोन्ही प्राध्यापका विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास तळोधी येथील पोलीस निरीक्षक राहुल गुहे करीत आहेत
Comments are closed.