चंद्रपुरात एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम, विद्यार्थ्यांनी साकारले शांती प्रतिकाचे चिन्ह; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
एकीकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावाने जग ग्रासलेले असताना आता शांततेचा एक बुलंद आवाज आज चंद्रपुरात घुमला. जगाच्या शांतीसाठी चंद्रपुरातील सोमय्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. यानिमित्ताने चंद्रपुरात एकाच महिन्यात दुसऱ्या विश्वविक्रमाची नोंद झाली.
चंद्रपूरच्या सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनने आज शांतीचे प्रतीक असलेले चिन्ह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारत गिनिज बुकात नाव नोंदवले. यापूर्वी हा विक्रम एक हजार 70 मुलांचा होता. तो मोडून आज एक हजार तीनशे विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम केला. त्यासाठी गिनिज बुक संस्थेच्या प्रतिनिधीने सोमय्या ग्रुपचे संचालक पांडुरंग आंबटकर यांना प्रमाणपत्र सोपवले. या समूहाने १ मार्च रोजी २७०० महिलांच्या लावणी नृत्याचा जागतिक विक्रम केला होता.
आज चंद्रपुरातील वडगावच्या सोमय्या कॅम्पसमध्ये ‘जगातील सर्वात मोठे मानवी शांतता चिन्ह’ (Human Peace Symbol) साकारण्यात आले आणि याची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. त्यामुळे चंद्रपूरच्या खात्यात चौथ्या विश्वविक्रमाची नोंद झाली.
Comments are closed.