भरधाव वेगात असलेल्या डिझेल टँकरला लागली आग, टँकर जळून खाक

भरधाव वेगात असलेल्या डिझेल टँकर ला आग लागल्याने टँकर जळून खाक झाल्याची घटना चंद्रपूर नागभीड ब्रह्मपुरी महामार्गावरील सायगाटा या गावाजवळ घडली. टॅंकर चा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
सायंकाळी च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. KCC कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये डिझेल पुरवठा करणाऱ्या डिझेल टँकर ला ही आग लागली असून आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल घटना घटनास्थळी दाखल झाली आहे.

Comments are closed.