Chandrapur ट्रक व टाटा मॅजिकच्या अपघातात दोन जण ठार, 16 जण गंभीर जखमी

शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने समोरुन प्रवाशी घेऊन निघालेल्या काळ्या पिवळ्या टाटा मॅजिकला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू तर 16 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव जवळ घटना घडली.

या अपघातात मॅजिक चालकासह एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . पुढील तपास मूल पोलीस निरीक्षक करीत आहेत.

Comments are closed.