हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आव्हान दिलं आहे. राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढावी, असं खुलं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बावनकुळेंच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळेंनी क्रिकेटच्या मैदानावर चौफेर फटकेबाजीही केली.
दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले
दिल्लीच्या विधानसभेत भाजपला मोठं यश मिळालं आहेय या निवडणुकीत आपचा आणि काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला तर या निवडणुकीत खातेही खोलता आले नाही. अशातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना खुळं आव्हान दिलं आहे. 2029 च्या विधानसभेत राहुल गांधींनी माझ्याशी सामना करावा असे बावनकुळे म्हणाले. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले आहे. आता ईव्हीएम मशीन सेट होती, असा आरोप काँग्रेस आणि संजय राऊत करायला सुरुवात करतील, अशी खोचक टीकाही चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केली.
राहुल गांधींना चितपट केल्याशिवाय राहणार नाही
कामठी विधानसभा निवडणुकीत सलग पाच वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेच गडबड झाली आहे. त्यामुळं माझं राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी असे बावनकुळे म्हणाले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन असेही बावनकुळे म्हणाले. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहे, असेही बावकुळे म्हणाले. ते जर लढायला तयार झाले तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही असेही बावनकुले म्हणाले.
काँग्रेस पार्टीने कधीही जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही
काँग्रेस पार्टीने कधीही जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचे बावनकुळे म्हणाले. देशाच्या 75 टक्के भुभागावर भाजपचं सरकार आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळं देशाचा विकास होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मते दिली आहेत. त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत असेही ते म्हणाले. दिल्लीच्या विजयाने देशात नोंद झाली आहे. देश मोदीजींच्या पाठीमागे आहे असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Comments are closed.