Chandrashekhar Bawankule gave clarification regarding Sudhakar Badgujar entry in BJP
मंगळवारी (ता. 17 जून) सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या पुढाकारानेच बडगुजर यांना पक्षात प्रवेश मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आज होणाऱ्या या पक्ष प्रवेशाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कोणतीच माहिती नसल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
मुंबई : ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा आज अखेर भाजपात प्रवेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी माजी मंत्री, ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांचाही पक्ष प्रवेश झाला. पण या पक्ष प्रवेशाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणतीच माहिती नव्हती, असे स्वतः त्यांनीच सकाळी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पण हा पक्ष प्रवेश बुधवारी किंवा गुरुवारी होणार अशी सोमवारी (ता. 16 जून) रात्री चर्चा झाली होती, असे बावनकुळे यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले. त्यामुळे भाजपात इतका गैरसंवाद आहे की, बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाबाबत स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना माहिती नव्हती, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Chandrashekhar Bawankule gave clarification regarding Sudhakar Badgujar entry in BJP)
मंगळवारी (ता. 17 जून) सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या पुढाकारानेच बडगुजर यांना पक्षात प्रवेश मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आज दुपारी होणाऱ्या या पक्ष प्रवेशाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कोणतीच माहिती नसल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. पण आता या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या बावनकुळे यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले. ते याबाबत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झाला आहे. आम्ही सर्व कोअर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल. अधिक ताकदीने आम्हाला पुढे जाता येईल, असे सुरुवातीला बावनकुळेंनी म्हटले.
हेही वाचा… Sudhakar Badgujar : ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो…; बडगुजर यांचा ठाकरे गटाला इशारा
तसेच, बडगुजर आणि घोलप यांच्या भाजपा प्रवेशाने मोठा विजय प्राप्त करता येईल. नाशिकमध्ये मोठी संख्या गाठणे सहज शक्य होणार आहे. पुढील काळात फडणवीसांच्या नेतृत्वात अनेक प्रकल्प केले जाणार आहेत. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आम्हाला फायदा होईल. पण प्रत्येक पक्षप्रवेश हा भारतीय जनता पक्षाच्या विकासासाठी होतो. आज सकाळी मी निघालो तेव्हा मला पक्ष प्रवेशाबाबत माहीत नव्हते. पण गिरीश महाजन यांनी आज ठरवले आणि पक्ष प्रवेश आजच करायचे हे निश्चिचत करण्यात आले. कारण काल आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा हा पक्ष प्रवेश उद्या बुधवारी किंवा परवा गुरुवारी करायचे ठरले होते. पण रात्री उशिरा गिरीश महाजन यांनी या पक्ष प्रवेशाला आजच करायचे ठरवल्याने आम्हाला याची उशिरा माहिती मिळाली. पण आज मंगळवार हा चांगला दिवस असल्याने हा पक्ष प्रवेश झाला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा या पक्ष प्रवेशाला आले. खरं तर दोन दिवसांनी हा पक्ष प्रवेश झाला असता तर मोठा स्टेज बांधून हा पक्ष प्रवेश करण्याचे ठरवले होते. पण आता हा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आल्याचे म्हणत बावनकुळेंनी सकाळी केलेल्या विधानावरून घुमजाव केले आहे.
Comments are closed.