दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देणं शक्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; म्हणाले…


चंद्रशेखर बावंकुले: संपूर्ण राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे. पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झाले आहे. या नुकसानीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढायचं आहे. चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, पण शेतकऱ्याने नुकसान (Maharashtra Floods) भरपाईतून बाहेर काढलं गेलं पाहीजे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठलीही भूमिका घ्यावी लागली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार तशी भूमिका घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. किंबहुना शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही. असे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले आहे. तसेच दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल (Chandrashekhar Bawankule on Maharashtra Floods)

राज्यातील शेतकऱ्यांना NDRF च्या निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे. पाच तारखेपर्यंत राज्यातील संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते बसून निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना अधिक मदत दिली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे. शिवाय, दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य आहे. कारण मायनस अकाउंटमध्ये सुद्धा पैसे देता येतात. संपूर्ण पंचनामे चार-पाच तारखेपर्यंत होईल, एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन संपूर्ण नुकसान भरपाई करता मदत दिली जाईल. यात घर, जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावरच चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी किती खर्च येईल, किती नुकसान भरपाई द्यावी लागेल, सरकारवर किती बोझा येईल याचा सगळ्या अभ्यास करून निर्णय होईल. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी समिती काम करत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्महाऊस आहे. पण खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे. तो यातून वगळला जाऊ नये. ज्यांनी फार्म हाऊस बांधले. काही जमिनीवर लेआउट पडलेले आहे. ते जमिन अकृषक दाखवलेली आहे. निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल. असेही महसूलमंत्री म्हणाले.

……तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule on Farmers Loan Waiver)

जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे. कुठल्याही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये. नियमावर बोट ठेवून न चालता, काही नुकसान हे नैसर्गिक आहे. कारण बांधावरचे पूर्णतः जमीन ही खरडून निघालेली आहे. फिल्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून सर्व तलाठी, महसुली अधिकारी, ग्रामविकास अधिकारी फिल्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जात आहे. सरकारकडे जर आकडे चुकीचे आले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.