परवानगीशिवाय ऑफिस सोडले तर निलंबित करणार, मंत्री बावनकुळे यांच्या आदेशाने खळबळ

पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.

महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त व संचालक यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनापरवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याची तक्रार बावनकुळे यांच्याकडे आली होती. कर्मचारी जागेवर नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे नाहक प्रलंबित राहत होती. तक्रारींची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने महसूल मंत्र्यांनी गंभीर दखल घेत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Comments are closed.